PostImage

सुपर फास्ट बातमी

Sept. 1, 2024   

PostImage

पोलीस उप मुख्यालय प्राणहिता येथे कार्यरत असलेले पोलीस शिपाई याने …


अहेरी: पोलीस उप मुख्यालय प्राणहिता येथे कार्यरत असलेले पोलीस शिपाई ज्ञानेश्वर केंद्रे जिल्हा नांदेड यांनी काल रात्र अंदाजे 10.00 च्या दरम्यान राखीव पोलीस निरीक्षक या अधिकाऱ्यांच्या मानसिक त्रासामुळे एसडीएम बंगलाअहेरी येथे आत्महत्या केल्याची माहिती मिळालेली आहे. 

 

त्यामुळे पोलीस विभागात एकच खडबड उडालेले आहेत. ज्ञानेश्वर केंद्रे यांनी या अगोदर c-60 मध्ये सुद्धा नोकरी केलेली आहे . त्यांची पोस्टिंग पोलीस उप मुख्यालय प्राणहिता येथे होती. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मानसिक त्रास सहन न झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. त्यामुळे केंद्रे परिवारावर शोसकळा पसरलेली आहे. तरी या आत्महत्येसाठी जबाबदार कोण आहे ? याचा तपास करून त्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केंद्रे परिवाराने पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्याकडे केली आहे


PostImage

सुपर फास्ट बातमी

Aug. 4, 2024   

PostImage

तुम्ही दारू कितीही पकडा आम्हीं विकनारच....


 

 

दारुविक्रेत्यांची धरपकड; तिघे पोलिसांच्या ताब्यात धाडसत्रात दारूसह 2.35 लाखांचा ऐवज जप्त

 

गडचिरोली, ब्यूरो. शहर पोलिसांनी दारुविक्रेत्यांविरोधात धाडसत्र अवलंबविले आहे. तालुक्यातील विविध ठिकाणी राबविलेल्या धाडसत्रादरम्यान दारुविक्रेत्यांची धरपकड सुरु आहे. याअंतर्गत शुक्रवारी, (दि.2) राबविलेल्या धाडसत्रात एक दुचाकीसह 2 लाख 35 हजार 570 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात तीन दारुविक्रेत्यांना अटक करण्यात आली असून दारुविक्रेते पित्रा-पुत्र पसार झाले आहेत.

 

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये सौरभ सेन (रा. गडचिरोली, वासुदेव मेश्राम (रा. दिभना) व संगीता खोब्रागडे (रा. मोहझरी) यांचा समावेश आहे. तर तालुक्यातील काटली येथील लालाजी बारसागडे व नरेश बारसागडे पिता-पुत्र फरारी आहेत. शहर पोलिसांच्या डीबी पथकाने ठाण्याअंतर्गत येत असलेल्या काटली चक गावातील लालाजी बारसागडे यांच्या घरी धाड टाकून 1

 

लाख 54 हजार रूपये किंमतीची देशी दारु जप्त केली. मात्र पोलिसांची भनक लागल्याने पिता-पुत्र पळून जाण्यात यशस्वी झाले. 

 

दुसरी कारवाई पोटेगाव मार्गावर करण्यात आली. यात सौरभ सेन यास दारु विक्री करतांना रंगेहाथ पकडून त्याच्याकडून दुचाकीसह 7 हजार रूपये किंमतीची दारु असा एकूण 62 हजार 500 रुपयांचा माल जप्त केला. दिभना येथील वासुदेव मेश्राम यांच्या घरी धाड टाकून 16 हजाराची देशी-विदेशी दारु तर मोहझरी येथील संगीता खोब्रागडे घरुन 3 हजार 70 रुपये किंमतीची दारु जप्त करण्यात आली. कारवाई ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांच्या नेतृत्वात धनंजय चौधरी, अविनाश लंजे, तुषार खोब्रागडे, वृषाली चव्हाण यांनी पार पाडली. मागील काही दिवसांपासून गडचिरोली पोलिसांनी दारु विक्रेत्यांवर धाडसत्र आरंभिले असल्याने विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

 

 


PostImage

P10NEWS

July 29, 2024   

PostImage

GADCHIROLI POLICE BHARTI : एकुण 6711 उमेदवारांमधून 6657 उमेदवारांनी दिली …


 


     प्रचंड पावसातही 99 टक्के उमेदवारांनी दिली पोलीस शिपाई पदासाठीची लेखी परिक्षा


     महिला उमेदवारांची 100 टक्के उपस्थिती.
      पुरपरिस्थितीमुळे संपर्काबाहेर असलेल्या भागातील 26 उमेदवारांना जिल्हा प्रशासन व एसडीआरएफच्या मदतीने बोटीद्वारे बाहेर काढुन त्यांना परिक्षा केंद्रावर पोहचविण्यात आले.
    एकुण 6711 उमेदवारांमधून 6657 उमेदवारांनी दिली लेखी परिक्षा.

 

गडचिरोली/(28): गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती 2022-23 प्रत्यक्ष भरती 2024 च्या 912 जागांसाठी आज दिनांक 28/07/2024 रोजी गडचिरोली पोलीस दलातर्फे लेखी परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. ही परीक्षा अत्याधूनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने व अत्यंत पारदर्शक पध्दतीने गडचिरोली पोलीस दलामार्फत पार पाडण्यात आली.
गडचिरोली पोलीस दलातर्फे 912 पोलीस शिपाई पदांसाठीची मैदानी चाचणी ही दिनांक 21/06/2024 ते 13/07/2024 रोजी पर्यंत गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर राबविण्यात आलेली होती.  सदर मैदानी चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या गुणांच्या आधारे लेखी परिक्षेसाठी पात्र एकुण 6711 उमेदवारांसाठी लेखी परीक्षा ही आज दिनांक 28/07/2024 रोजीचे सकाळी 08.00 वा. आयोजीत करण्यात आलेली होती.  यामध्ये पहिला पेपर सामान्य अध्ययन या विषयाचा सकाळी 10.30 ते 12.00 या दरम्यान व दुसरा पेपर गोंडी व माडीया या विषयावर सकाळी 13.30 ते 15.00 वा. दरम्यान घेण्यात आला.  सदरची लेखी परीक्षा ही गडचिरोली शहरातील 1) महिला महाविद्यालय, चंद्रपूर रोड गडचिरोली, 2) फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, चंद्रपूर रोड गडचिरोली (महिला महाविद्यालय जवळ), 3) प्लॅटिनम ज्युबली हायस्कुल, आरमोरी रोड गडचिरोली, 4) आदिवासी इंग्लीश मिडीयम स्कुल, सेमाना रोड गडचिरोली, 5) कारमेल हायस्कुल, धानोरा रोड गडचिरोली, 6) स्कुल ऑॅफ स्कॉलर, धानोरा रोड गडचिरोली, 7) शिवाजी हायस्कुल तथा विज्ञान महाविद्यालय गोकुलनगर गडचिरोली, 8) शिवाजी इंग्लीश अॅकॅडमी स्कुल, गोकुलनगर गडचिरोली, 9) शासकिय कृषी महाविदयालय, आयटिआय चौक गडचिरोली, 10) शासकिय विज्ञान महाविद्यालय, चामोर्शी रोड गडचिरोली, 11) शिवाजी महाविद्यालय, धानोरा रोड गडचिरोली, अशा एकुण 11 केंद्रावर घेण्यात आली. सर्व 11 परिक्षा केंद्राच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता. बंदोबस्ताकरीता 800 चे आसपास पोलीस अधिकारी व अंमलदारांची नेमणुक करण्यात आली होती. सदर लेखी परिक्षेसाठी पात्र एकुण 6711 उमेदवारांपैकी 6657 पुरुष व महिला उमेदवारांनी लेखी परिक्षा दिली.  सदर लेखी परिक्षेपासुन कोणतेही पात्र उमेदवार वंचित राहु नये म्हणुन वेळोवेळी सोशल मिडीया मार्फत गडचिरोली पोलीस दलाकडुन सुचना देण्यात आल्या होत्या. यासोबतच सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जिल्ह्राभरात पुरपरिस्थिती निर्माण झालेली असतांना सुद्धा पुरपरिस्थितीमुळे संपर्काबाहेर असलेल्या भागातील 26 उमेदवारांना जिल्हा प्रशासन व एसडीआरएफच्या मदतीने बोटीद्वारे बाहेर काढण्यात आले व त्यांना परिक्षा केंद्रांवर पोहचविण्यात आले. त्यामुळे लेखी परिक्षेकरिता पात्र उमेदवारांपैकी 100 टक्के महिलांसह 99 टक्के उमेदवारांनी लेखी परीक्षेकरीता आपली हजेरी लावली. यासोबतच सर्व उमेदवारांना बायोमॅट्रीक पद्धतीने नोंदणीचे पुन:परिक्षण करुन त्यांना परिक्षा केंद्राच्या आत सोडण्यात आले. तसेच पेपर क्र.01 व पेपर क्र.02 च्या मधल्या वेळेत उमेदवारांसाठी नाश्त्याची व पाण्याची सुद्धा सोय करण्यात आलेली होती.
सदर लेखी परीक्षा पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. एम. रमेश, यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली.


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 15, 2024   

PostImage

निलगायीची शिकार; दहा आरोपी अटकेत


 

नवरगावच्या जंगलातील घटना : वनविभागाची कारवाई; पाच दिवसांची कोठडी

 

 गडचिरोली : जंगलात नीलगायीची शिकार करून तिच्या मांसाची गावात विक्री करीत असताना वनविभागाने धाड टाकून १० आरोपींना जेरबंद केले. दोन आरोपी फरार आहेत. सदर घटना शनिवारी नवरगाव येथे घडली. आरोपींकडून नीलगायीचे शिर, पाय, मांस व इतर अवयव तसेच कापण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहेत. सदर घटनेने वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.

 

पोर्ला वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या नवरगाव (दक्षिण) नियत क्षेत्रामध्ये दि. १३ जुलै रोजी निलगायीची शिकार करण्यात आली. शिकारीनंतर निलगायीच्या मांसाची गावात विक्री करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली. वनविभागाने गोपनीय माहितीच्या आधारे धाड टाकून दहा आरोपींना अटक केली. त्यांना रविवारी गडचिरोली जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दहाही आरोपींना पाच दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. सदर कारवाई पोर्लाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश मडावी,चुरचुराचे क्षेत्र सहायक के. बी. उसेंडी, पोर्लाचे क्षेत्र सहायक अरुण गेडाम, मरेगावचे क्षेत्र सहायक समर्थ, पोर्लाचे वनरक्षक विकास शिवणकर, दिभनाचे वनरक्षक गणेश काबेवार, किटाळीचे वनरक्षक संदीप लामकासे, देलोडाचे

 

वनरक्षक नितीन भोयर, वाहनचालक देवीदास चापले, वनमजूर विजय म्हशाखेत्री, गिरिधर बांबोळे, छत्रपती डहाले, दुर्योधन मेश्राम, सोनू खोब्रागडे, रवि डहाले, रूपेश मुनघाटे यांच्या पथकाने केली.

 

हे आहेत अटक झालेले आरोपी

खुदकम रघुनाथ गेडाम वय (२५, रा. कुहाडी), अक्षय प्रभाकर सेलोटे (२२, रा. नवरगाव), रोशन दामोधर भोयर (२२, रा. नवरगाव), निखिल गिरिधर ठाकरे (३०, रा. चुरचुरा), सौरभ सुरेश आवारी (२०, रा. नवरगाव), विक्रांत प्रकाश बोरकुटे (२३, रा. गोगाव), संकल्प संजय उंदीरवाडे (२४, रा. नवरगाव), संदीप कानिफ चुधरी (रा. नवरगाव), आकाश प्रभाकर सेलोटे (रा. नवरगाव), जगदीश देवराव थोराक (रा. नवरगाव) यांना अटक करण्यात आली आहे. समीर रवींद्र मडावी (रा. कुहाडी) व ओमराज विजय राजगडे (रा. चुरचुरा) हे दोन आरोपी फरार आहेत.

 

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

April 2, 2024   

PostImage

नक्षल्यांकडून ईसमाची हत्या; घटनास्थळी नक्षल्यांनी टाकली पत्रके


 

गडचिरोली : पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी एका ईसमाची हत्या केल्याची घटना आज शुक्रवार २९ मार्च रोजी अहेरी तालुक्यातील ताडगाव-दामरंचा रस्त्यावर पहाटेच्या सुमारास उघडकीस

 

आली. अशोक तलांडे असे मृतकाचे नाव आहे. ताडगावपासून पाच किलोमीटर अंतरावरील रस्त्यावर अशोक तलांडेचा मृतदेह आढळून आला.

 

घटनास्थळी नक्षल्यांनी पत्रक टाकले असून, अशोक तलांडे पोलिसांचा खबऱ्या असल्याने त्याची हत्या करण्यात आल्याचे

 

त्यात म्हटले आहे. अशोक तलांडे हा मागील काही दिवसांपासून ताडगाव येथे वास्तव्य करीत होता. मोलमजुरी करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. मात्र, नक्षल्यांनी आज त्याची हत्या केली. लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु असताना ही हत्या झाल्याने नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान पोलीस अधिक्षक निलोत्पल यांनी मृतक ईसम पोलीस खबऱ्या नसल्याचे सांगितले.


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 5, 2024   

PostImage

जिल्हाधिकाऱ्यांविरुध्द केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार


 गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हाधिकारी संजय मीणा यांची बदली करावी, अशी मागणी काँग्रेस कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष छगन शेडमाके यांनी ३ मार्चला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली.

 

दुर्गम भागातील वेंगपूर, सुरगाव, अळंगेपल्ली तसेच पडकाटोला या चार गावांना मूलभूत सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना कडक शब्दात फटकारले आहे. पेसा कायद्याची अंमलबजावणीकडे दुर्लक्ष, कथित धान घोटाळ्यात दोषींना पाठिशी घातल्याचे प्रकरण, उद्योगांच्या नावाखाली जमीन संपादन करताना दडपशाही यामुळे जिल्हाधिकारी मीणा हे वादात सापडले असल्याचा दावा करत शेडमाके यांनी त्यांच्या बदलीची मागणी केली आहे. विशिष्ट लोकप्रतिनिधींच्या मर्जीतील म्हणून ते ओळखले जातात, त्यामुळे लोकसभा निवडणुका पारदर्शक पध्दतीने पार पाडण्यासाठी त्यांची बदली गरजेची असल्याचे शेडमाके यांनी तक्रारीत म्हटले आहे.

 

प्रकरणे प्रलंबित

अतिक्रमणासह इतर प्रकरणे प्रलंबित असून जिल्हा प्रशासन वेळकाढू भूमिका घेत आहे. याचा देखील तक्रारीत उल्लेख आहे.

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 3, 2024   

PostImage

पोर्ला गावाजवळ झालेल्या अपघातात दोन तरुण जागीच ठार


 

 

गडचिरोली, ब्युरो. अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री 7 वाजताच्या सुमारास पोर्ला गावाजवळ घडली. समीर बोंडकू भानारकर (23) आणि प्रशांत मनोहर म्हस्के (26) रा. पोर्ला, अशी मृतकांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, समीर आणि प्रशांत काही कामानिमित्त शनिवारला गडचिरोली जिल्हा मुख्यालयात आले होते. काम आटोपून ते सायंकाळच्या सुमारास दुचाकीने स्वगावी पोर्लाकडे जात होते. दरम्यान, पोर्ला नजीकच्या ढाब्याजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघात घडताच नागरिकांची मोठी गर्दी जमली. घटनेबाबत गडचिरोली पोलिसांना माहिती देण्यात आली. अधिक तपास गडचिरोली पोलिस करीत आहेत.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 26, 2024   

PostImage

मासेमारी करताना नाव उलटून युवक ठार


 

 

 

 

गडचिरोली : जिल्हा मुख्यालयापासून पाच किमी अंतरावरील कोटगल बॅरेजमध्ये मासेमारी करताना नाव उलटल्याने युवक ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.

 

विनोद बाबुराव भोयर (३६) रा. कोटगल असे मृतक युवकाचे नाव आहे. नावेच्या मदतीने विनोद हा त्याच्या सहकाऱ्यांसोबत कोटगल बॅरेजच्या पाण्यात मासे पकडण्यासाठी रात्री ३ वाजता गेला होता. दरम्यान सकाळी ९ वाजता अचानक नाव उलटली.

 

विनोदच्या सहकाऱ्याला पोहता येत असल्याने तो पोहत बाहेर पडला. मात्र विनोदला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला. ही माहिती गडचिरोली पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून विनोदचा शोध सुरू केला.

 

दुपारच्या सुमारास त्याचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. विनोदचा अचानक मृत्यू झाल्यामुळे गावात शोककळा पसरली आहे. गडचिरोली पोलिस स्टेशनचे ठाणेदार अरुण फेगडे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 17, 2024   

PostImage

वडधा परिसरात देशी-विदेशी, मोह दारू विक्रीला कोणाचा आशीर्वाद?


 

 

 

सामाजिक स्वास्थ्य धोक्यात: कारवाई केव्हा होणार?

 

 वडधा : गडचिरोली जिल्हा हा दारूबंदी जिल्हा असला तरी मात्र जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूसह मोह फुलाची दारू सर्रासपणे विकली जात आहे. मात्र, या खुलेआम दारू विक्रीकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. आरमोरी तालुक्याच्या वडधा परिसरात देशी-विदेशी, मोह दारू विक्रीला कोणाचा आशीर्वाद? असा सवाल उपस्थित होत आहे.

 

पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे अनेक कुटुंबे दारूच्या आहारी जाऊन कित्येक नागरिकांनाविषारी दारू पिऊन जीवसुद्धा गमवावे लागले आहेत. अशी स्थिती आरमोरी तालुक्यातील वडधा परिसरामध्ये सुरू असून वडधा हे गाव ग्रामीण भागामध्ये केंद्रस्थान असल्याने येथे मोठ्या प्रमाणात दारू शौकीन आपली शौक भागविण्यासाठी येत असतात

 

वडधात देशी-विदेशी तसेच मोह फुलाची दारू खुलेआम मिळत असल्याने कायदा शांतता व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून दारूमुळे सुजाण नागरिकांना याचा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. एवढ्या खुलेआम दारू विक्रीला कोणाचे पाठबळ आहे, असा सवाल आहे. पाठबळ नसेल तर दारू विक्रेत्यांना एवढी मुजोरी येथे कुठून? बरेचसे नागरिक दारूच्या आहारी गेल्याने अतिशौकीन रोडलासुद्धा पडून असतात. वडधा परिसरात वाघाची दहशत असून रोडला पडून असलेल्या व्यक्तीच्या जिवाला धोका आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 13, 2024   

PostImage

व्हॉट्सॲपला ठेवले स्टेटस : जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यात जवानाची गोळी झाडून आत्महत्या


माणूस मरतो, आत्मा जिवंत राहतो

गडचिरोली : जिल्हाधिकाऱ्यांच्यायेथील शासकीयशिखरदीप बंगल्यात सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या राज्य राखीव दलाच्या सुरक्षारक्षक जवानाने माणूस मरतो, आत्मा जिवंत राहतो... असे स्टेटस व्हॉट्सअॅपला ठेवून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.

या घटनेने एकच खळबळ उडाली. उत्तम किसनराव श्रीरामे (३२) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. ते मूळचे नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील रहिवासी आहेत. श्रीरामे यांचा तीन वर्षांपूर्वीच विवाहझाला होता. राज्य राखीव दलाच्या पुणे येथील गट क्र. १ मध्ये सेवा बजावत होते. सध्या ते गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत होते. कॉम्प्लेक्स परिसरात जिल्हाधिकारी संजय मीणा यांचे शिखरदीप नावाचे शासकीय निवासस्थान आहे. या निवासस्थानी उत्तम श्रीरामे हे सुरक्षारक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ड्युटी संपल्यावर बंगल्यातीलच विश्रामगृहात खाटेवर झोपून स्वतःच्या डोक्यात पिस्तूलमधून गोळी झाडून घेतली

 

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

 

पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी घटनास्थळी सुसाईड नोट आढळली नाही, असे स्पष्ट केले. त्यांच्यावर कामाचा ताणही नव्हता, त्यांनी आत्महत्या का केली, हे स्पष्ट झालेले नसून अधिक तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 12, 2024   

PostImage

अखेर 'त्या' बेपत्ता इसमाचा विहीरीत सापडला मृतदेह


गडचिरोली - गेल्या दहा दिवसापासून चातगाव मधून बेपत्ता असलेल्या योगेश बारीकराव पेंदाम (३९) याचा मृतदेह गावालगतच्या विहिरीत आढळला. सदर इसम २९ जानेवारी २०२४ ला रात्री १ वाजून ५ मिनिटांनी घरून कोणाला काही न सांगता निघून गेला असल्याची माहिती

 

त्याच्या पत्नी कीर्तना पेंदाम यांनी पोलीस ठाण्यात दिनांक ३० जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता केलेल्या तक्रारीतून दिली होती. त्या अनुषंगाने पोलीसांनी तपास सुरू केला. पोलीस ठाणे हद्दीत पोलीस विभागाने शोध मोहीम सुरू केली. गावात दवंडी देऊन शोधमोहीम सुरू केली. 

 

पण कोठेही पत्ता लागला नाही. गावकऱ्यांनी सुद्धा चातगाव येथे गावात दवंडी दिली होती शेवटी त्याचा मृतदेह चातगाव येथीलच सुधाकर मारोती मडावी यांच्या शेत शिवाराला लागून असलेल्या विहिरीमध्ये दिसून आल्याची माहिती चातगांव पोलीस ठाण्यात देण्यात आली. 

 

चातगाव पोलीसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह विहिरीबाहेर काढून पंचनामा केला व त्याचे शव शवविच्छेदन करण्यासाठी रवाना केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांनी मृत्यूचे कारण अजूनही कळलेले नसल्याचे सांगितले. चातगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 12, 2024   

PostImage

बसमध्ये चोरी; ठाण्यात सर्वच प्रवाशांची झडती, महिलेच्या पर्समधून ७० हजार …


गडचिरोली : चामोर्शी ते गडचिरोली या प्रवासादरम्यान एका महिला प्रवाशाच्या पर्समधून सुमारे ७० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी महिलेच्या मागणीनुसार ब्रस थेट गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये लावण्यात आली. पोलिसांनी बसमधील ५३ प्रवाशांची झडती घेतली. मात्र कोणाकडेही पैसे आढळून आले नाहीत. त्यामुळे त्यांना सोडण्यात आले.

 

गोंडपिंपरी तालुक्यातील राळापेठ येथील पौर्णिमा राजू राऊत यांचे गडचिरोली तालुक्यातील वाकडी येथील माहेर आहे. माहेरी येण्यासाठी सर्वप्रथम त्या आष्टी येथून चामोर्शी येथे पोहोचल्या. नंतर चामोर्शी येथून अहेरी ब्रह्मपुरी या बसमध्ये बसल्या. त्यांच्यासोबत त्यांची दोन लहान मुले होती. बसमध्ये गर्दी असल्याने त्या सर्वात मागच्या सिटरवर जाऊन बसल्या. दरम्यान, येवली येथे बस आल्यानंतर पर्स बघितले असता पर्समध्ये पैसे नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना धक्काच बसला. वैशाली यांनी ही बाब बसचे वाहक पौर्णिमा टेंभुर्णे यांच्या लक्षात आणून दिली. बस गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये लावण्यात आली. यावेळी बसमध्ये ५३ प्रवासी होते. सर्व प्रवाशांची पोलिसांनी झडती घेतली. मात्र एकाही प्रवाशाकडे पैसे आढळले नाही. या प्रकरणाचा तपास ठाणेदार अरुण फेगडे यांच्या मार्गदर्शनात केला जात आहे.

 

दोघे तळोधीत, नऊ जण कुनघाडात उतरले

 

 याबाबत वैशाली राऊत यांनी सांगितले की, त्यांनी चामोर्शीत पर्स तपासली तेव्हा पर्समध्ये पैसे होते. त्यामुळे पैसे चामोर्शीनंतरच्या प्रवासादरम्यान चोरीला गेले असण्याची शक्यता आहे. • दोन प्रवासी तळोधीत तर नऊ प्रवासी कुनघाडात उतरले. त्यांच्यापैकीच काही जणांनी पैसे लंपास केले असण्याची शक्यता वैशाली यांनी व्यक्त केली आहे.

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 22, 2024   

PostImage

Gadchiroli news: देशी-विदेशी दारु व बियरचा अवैधरित्या पुरवठा करताना सापडले


गडचिरोली: दिनांक 21/01/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथे गोपनिय माहिती मिळाली कीे, पोलीस स्टेशन, गडचिरोली हद्यीतील दारु तस्कर गोपाल बावणे, रा. ढिवर मोहल्ला, गडचिरोली हा त्याचे सहका-यांच्या मार्फतीने चंद्रपुर जिल्ह्यातुन चारचाकी वाहनाने गडचिरोली शहरातील चिल्लर दारु विक्रेत्यांना देशी-विदेशी दारु व बियरचा अवैधरित्या पुरवठा करण्याकरीता मोठ्या प्रमाणात दारुची खेप आणणार आहे. अशा मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व कर्मचारी यांनी शासकीय विश्राम भवन, गडचिरोली जवळ दिनांक 22/01/2023 रोजीच्या रात्रो दरम्यान सापळा रचुन नाकाबंदी लावली असता, मिळालेल्या गोपनिय माहितीतील संशयीत पांढ-या रंंगाचे मारोती सुझुकी कंपनीचे अल्टो वाहन हे येताना दिसले असता पोलीसांनी त्यास थंाबविण्याकरीता ईशारा दिला.

 परंतू वाहन चालकानी पोलीसांच्या इशा-यास न जुमानता वाहनासह पळ काढला. त्यानंतर पोलीसांनी क्षणाचाही विलंब न करता त्या वाहनाचा पाठलाग सुरु केला. अवैध दारु वाहतुक करीत असलेल्या वाहन चालकाने कारवाई टाळण्याकरीता त्यांचे ताब्यातील वाहन गडचिरोली शहराच्या दिशेने नेत असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफिने सदर वाहनास अडवीले असता वाहन चालक व त्याचा साथीदार अनुक्रमे नामे 1) प्रफुल टिंगुसले, रा. गोकुळनगर, गडचिरोली व 2) गणेश टिंगुसले, रा. ढिवर मोहल्ला, गडचिरोली यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीसांनी त्यांचाही पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले. सदरच्या दारुच्या अवैध वाहतुकीत सहभागी असलेला ईसम नामे गोपाल बावणे हा ही कार्यवाही सुरु असतांना अंधाराचा फायदा घेऊन दुचाकी वाहनाने फरार झाला.